CSC EXPERT FOR BUSINESS

आपण जो व्यवसाय करतो त्या व्यवसायाबद्दल जर आपण परिचित नसू तर आपण उन्नती च्या रस्त्याने नाही तर अधोगती च्या दिशने मार्गक्रमण करत आहोत असे समजायला हरकत नाही.

त्याचबरोबर आम्ही आमच्या व्यवसायात अपडेट राहणे सुद्धा खूप गरजेचे आहे. आम्ही अपडेट नाही राहिलो तर आउटडेट कधी होऊ हे कळणार सुद्धा नाही.. आपल्या सर्वांना अपडेट करण्यासाठी आम्ही एक अभ्यासक्रम तयार करत आहोत तो आता आपण समजून घेऊया..

अभ्यास सुरु करण्यापूर्वी आम्ही प्रथम हा निश्चय करू कि आम्ही हा अभ्यास मधेच सोडणार नाही स्टेप सोडून पुढची स्टेप पकडणार नाही.. असे असेल तर खर्या अर्थाने आमचा अभ्यास पूर्ण होईल. या अभ्यासामध्ये आंम्ही youtub चे काही लिंक देणार आहोत. आपल्याला वेळ काढून त्या पहायच्या आहेत..दररोज जास्तीत जास्त वेळ काढून या लिंक सिरीयल नंबर ने पहायच्या आहेत.  आणि विचार करायचा आहे..

१.यामध्ये आपण csc हि किती मोठी योजना आहे. आणि सरकार या बाबतीत काय उद्देश ठेऊन आपल्याला प्रमोट करत आहे आणि डिजिटल इंडिया काय आहे हे समजेल व त्यातून आज आणि भविष्यात आपल्याला काय व्यवसायाच्या संधी आहेत ह्याचा विचार करा

Mr.Ganesh Kanhere Patil

.यामध्ये आपण csc हि किती मोठी योजना आहे. आणि सरकार या बाबतीत काय उद्देश ठेऊन आपल्याला प्रमोट करत आहे आणि डिजिटल इंडिया काय आहे हे समजेल व त्यातून आज आणि भविष्यात आपल्याला काय व्यवसायाच्या संधी आहेत ह्याचा विचार करा त्याकरिता पुढील लिंक पहा :

२.  csc च्या सतत विविध कार्यशाळा आयोजित केल्या जातात त्यातून पुढील व्यवसायाच्या संधी बाबतीत दिशानिर्देश केले जातात. यासाठी भारताचे IT मिनिस्टर श्रीमान रवि शंकर प्रसाद व csc spv चे आमचे श्रीमान दिनेश त्यागी जी यांचे csc बाबतीत चे व्हिजन आणि प्रयत्न आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे. यात आपण बर्याच भाषणांच्या लिंक जोडलेल्या आहेत. परंतु हे प्रत्येक भाषण म्हणजे आम्हाला एक नवा व्यवसाय उभा करण्याची गुरुकिल्ली देणार आहे. त्यामुळे हि सर्व भाषणे वेळ काढून ऐकणे गरजेचे आहे.

३.csc चे देशभरात लाखो सेंटर आहेत. हे देशभरातील vle कशाप्रकारे काम करत आहेत आणि आपल्या गावाची दिशा कशी बदलत आहेत हे सुद्धा आपण जाणून घेतले पाहिजे.

जेणेकरून असे आदर्शवत काम करून आम्ही आमचा व आमच्या गावाचा उत्कर्ष कसा करू शकतो हे आपण पुढील shot film मधून जाणून घेऊया.

 आणि दुसर्या लिंक द्वारे vle देश बदलणाऱ्या प्रक्रियेत किती महत्वाची भूमिका पार पडू शकतो हे जाणून घेऊया. तिसर्या लिंक मधून अनोकी झेप देशभरातील vle घेत आहे त्याचा रिपोर्ट पाहूया   :

.एखादा vle csc च्या माध्यमातून काय क्रांती करू शकतो हे कोली प्रसाद या vle च्या प्रयत्नातून दिसते आहे. जालना औरंगाबाद मध्ये मोठा instriyal caridoar स्थापन होत आहे लाखो नवीन नोकरदार कुटुंब येथे येणार आहेत जालना सोसायटी एक district लेवल इ कॉमर्स पोर्टल विकसित करून शहरी नागरिकाला दुध,फळे,भाजीपला व जीवनावश्यक वस्तू वितरीत कण्यासाठी सिस्टम तयार करत आहेत. ज्याद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक गावातील vle ला एक नवा रोजगार उपलब्ध होणार आहे व काही शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येणार आहे . त्या बाबतीत कोली प्रसाद हा vle आमचा दिशादर्शक आहे. जाणून घेऊया त्याने त्याच्या परिसरात कसे काम केले.

.पतंजली सोबत csc चा करार झाला आहे.

पतंजली च्या माध्यमातून आम्हाला किती मोठ्या व्यवसायाच्या संधी आहेत ते जाणून घ्या पुढील लिंक मधून -:

६.याच बरोबर कृषि आधारित सेवे मध्ये इफको सोबत csc spv चा करार झालेला आहे.

इफको csc vle साठी किती मोह्या व्यवसायाच्या संधी घेऊन आलेले आहेत हे जाणून घ्या पुढील लिंक मधून :

.pmgdisha हि खूप मोठी सेवा csc मध्ये आहे.

याद्वारे आपण डिजिटल साक्षरता गावात निर्माण करण्याचे खूप मोठे काम करू शकतो त्या विषयी काही क्लीप आपण पाहूया :

८.senetari pad उद्योगातून आपणा किती चांगल्या प्रकारे काम करू शकतो,

या विषयी मा.मंत्रीजी रवि शंकर प्रसाद व स्मृती इराणी जी यांच्याकडून माहिती मिळवूया पुढील लिंक मधून :

.आयुष्यमान भारत या खूप मोठ्या योजनेचे काम csc vle करणार आहेत  त्या बाबतीत च्या माहितीची लिंक :

१०.टेलीमेडिसिन सेवा काय आहे हे जाणून घ्या पुढील लिंक मधून :

११.रेल्वे तिकीट आता आपण आपल्या csc सेंटर द्वारे काढू शकतो त्या विषयी आपण माहिती पुढील क्लीप मध्ये पाहू :

 

११.2

तसेच देशाचे रेल्वे मंत्री श्रीमान पीयूष गोयल यांनी csc मध्ये रेल्वे तिकीट व बँकिंग सेवा बाबतीत सविस्तर माहिती दिलेली आहे ते भाषण आपणा पाहू व विचार करू कि सरकार csc vle साठी काय काय संधी समोर घेऊन आलेले आहे पुढील क्लीप पाहू :

१२.आपल्याला जालना जिल्ह्यात जास्तीत जास्त गावात जेनरिक मेडिकल स्टोअर्स सुरु करायचे आहेत त्या बाबतीत माहिती करिता पुढील क्लीप पहा :

13.आणि आता शेवटी आपण csc गीत मधून प्रेरणा घेऊन डिजिटल क्रांतीचे अग्रदूत बनवून नव्या भारताचे समृद्ध गाव बनवूया….

लवकरच आम्ही csc मधील सर्व सेवा कशा वापराव्या या विषयी अनेक क्लीप ची निर्मिती करून सर्वांसाठी हि माहिती खुली करणार आहोत.

 

धन्यवाद

संकलन : JALNA MH CSC VLE CO-OPRETIVE SOCIETY

2258total visits,1visits today