बदनापूर तालुक्यातील सर्व vle ची अत्यंत महत्वाचा वर्कशॉप

तहसील कार्यालय येथे बदनापूर तालुक्यातील सर्व vle ची अत्यंत महत्वाचा वर्कशॉप संपन्न .  बदनापूर तालुक्यातील सर्व vle नि पतंजली,इफको,pmgdisha, मतदान कार्ड या सारख्या सर्वच सेवा जनतेपर्यंत पोचविण्यासाठी व्यापक आयोजन केले.
प्रत्येक vle स्वतःच्या सेंटर मध्ये किमान 20 हजाराचा पतंजलीची प्रोडक्ट ठेवणार आहे.तसेच 20-20 शेतकऱ्याचे गट बनऊन,त्यांना प्रत्यक्षात भेटून, त्यांना लागणाऱ्या खते,बियाणे,कीटकनाशके यांची यादी बनविण्याची सुरुवात आजपासून सर्व vle नि सुरुवात केली आहे.

याप्रसंगी csc dm शिवहारी जयभाय यांनी खूप छान मार्गदर्शन केले.
शिवाय
इफको चे अमित सर यांनी सांगितले की इफको ची सर्वच कीटकनाशके हे इतर कीटकनाशके च्या किमती पेक्षा 30 ते 50 % स्वस्त आहेत , त्यात vle ना मार्जिन तर जास्त आहेच परंतु ती कीटकनाशके फक्त csc मधेच भेटतील,,इतर खासगी दुकानावर ते सहज नाही भेटणार.त्याच बरोबर त्यांनी हे ही सांगितले की vle जर त्याच्या गावातील 70-80 शेतकऱ्यांना एकत्र आणेल तर इफको ची टीम त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून ,शेतकरी सभा घेऊन vle च्या व्यवसाय वाढी करिता मदत करेल.

इफको चे क्षेत्रिय अधिकारी श्री साकळे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी त्यांनी इफको ची टीम csc vle ना त्यांनी बुक केलेल्या मालाची डिलीव्हरी कशी त्वरित दिल्या जाईल या बाबतीत मार्गदर्शन केले.सोबतच त्यांना इफको ने शेतीविषयक अभ्यासासाठी इस्राईल दौऱ्यावर पाठवले होते ते अनुभव ही त्यांनी vle ना सांगितले.
परिणामी vle मध्ये एका नव्या जोशाने व्यवसाय करण्याची उमेद आणि विश्वास व जोश निर्माण झाला.

1324total visits,1visits today