मेक इन जालना उपक्रमाची सुरुवात.

बदनापूर येथे जालना एमएच सिएससी व्हिएलइ को – ऑपरेटिव्ह सोसायटीच्या कार्यालयाचे उदघाटन मा.खा.रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख उपस्तीती आ.नारायनभाऊ कुचे यांची होती.

या प्रसंगी मेक इन जालना या बहुउद्देशीय योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

🌷काय आहे मेक इन जालना ?

देशात मोदी सरकार ने मेक इन इंडिया व महाराष्ट्रात मेक इन महाराष्ट्र या योजनेद्वारे विविध रोजगाराच्या संधी निर्माण केल्या.अनेक उद्योग देशात आणले.
याच धर्तीवर जालना जिल्ह्यातील सर्व डिजिटल सेवा केंद्र (csc)म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रचालकांची सहकारी सोसायटी शासन निर्देशानुसार स्थापन करण्यात आली.
या सोसायटीद्वारे गावागावातील केंद्रचालकांच्या माध्यमातून जनतेला विविध सरकारी सेवा बरोबर अनेक शेतकरी उपयोगी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
या csc केंद्राद्वारे शेतकऱ्यांना ऑनलाईन खाते,बियाणे,कीटकनाशके,शेतीऔजारे घरपोच mrp मध्ये मिळणार आहेत.
तसेच याच केंद्रातून आता ऑनलाईन पतंजलीचे सामानही घरपोच मिळणार आहे.
याचबरोबर शेकर्यांनी पिकविलेले अन्नधान्य,भाजीपाला,फळे,जैविक उत्पादने शहरी नागरिकाला घरपोच मिळणार आहेत.
ही सर्व यंत्रणा राबविण्यासाठी जिल्हा सोसायटी स्थापन करण्यात आली असून या सोसायटी च्या कार्यालयाचे उद्धाटन आज करण्यात आले.
या प्रसंगी सोसायटी चे अध्यक्ष गणेश कान्हेरे यांनी अशी माहिती दिली की, मेक इन जालना अंतर्गत महिला बचत गटांच्या मार्फत सेनेटरी पॅड निर्मिती कारखाना,घरगुती लोणचं निर्मिती कारखाना,पापड,चिवडा,केळी चिप्स कारखाना असे उद्योग सुरू करण्यात येणार असून देशातील अडीच लाख सेंटर च्या माध्यमातून या मालाच्या विक्री देशभरात करण्याचे नियोजन जालना सोसायटी करणार आहे.
आरोग्यविषयक उपक्रमाअंतर्गत अंतर्गत जेनेरिक मेडिकल,इ हॉस्पिटल,इ टेलिमेडिसीन च्या सेंटर ची शृंखला जालना जिल्ह्यात सुरू करण्यात येणार आहे.
सोसायटी केंद्रचलकांच्या माध्यमातून इफको च्या सहकार्यातून मातीपरिक्षण फिरती प्रयोगशाळा व शेतीविषयी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करत आहे.

याप्रसंगी सोसायटी चे सचिव प्रतापराव काळे यांनी माहिती दिली की,आशा प्रकारची सोसायटी महाराष्ट्रात सर्वप्रथम जालना जिल्ह्यात स्थापन करण्यात आली असून असा प्रयत्न करणारा जालना जिल्हा देशात 7 व्या क्रमांकावर आहे.

या सोसायटीद्वारे चालविल्या जाणाऱ्या मेक इन जालना ह्या उपक्रमामुळे जालना जिल्ह्यातील हजारो महिला,युवक,शेतकरी यांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून हे सर्व शासनाच्या अधिपत्याखाली चालणार असल्यामुळे जनतेची विश्वासहर्ता या csc केंद्रचालकांच्या सोसायटीला मिळत आहे.
गावागावातील केंद्रचालकात आणि जनतेत एक उत्साहाचे वातावरण निर्माण होत असून सरकार च्या या लोकउपयोगी उपक्रमाला जनता प्रतिसाद देत आहे.
या केंद्रामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे कारण त्यांना बियाणे,खते, कीटकनाशके आणण्यासाठी शहरात जाण्याची गरज नसून रास्तभावत हा माल आता घरपोच मिळणार आहे.त्याच बरोबर ह्या केंद्रचलकांच्या माध्यमातून शेतीमाल देशातील विविध कंपन्यांना ऑनलाईन विकल्या जाणार आहे.आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या भावात शेतीमाल थेट परदेशात ही विकता येऊ शकेल.आणि त्यासाठी मध्यम असेल त्यांच्याच गावातील csc केंद्रचालक.
त्याचबरोबर गावागावात देसी गायी च्या डेअरी सुरू करण्यासाठी ही जालना vle सोसायटी प्रयत्न करणार आहे.
एकंदरीत डिजिटल इंडिया चा खरा लाभ आता शेतकऱ्यांना मिळणार आहे.
अशा प्रकारे गणेश कान्हेरे यांच्या अध्यक्षतेखाली या सहकारी सोसायटी ची वेगवान प्रगती सुरू झाली असून जालना जिल्ह्यातील प्रत्येक गावात csc सेंटर सुरू करून डिजिटल सेवांमध्ये जालना जिल्हा देशात अग्रक्रमांकवर रहावा यासाठी ही सोसायटी अहोरात्र परिश्रम करीत आहे.

1027total visits,1visits today